COVID-19 : करीम मोरानी ‘कोरोना’तून बरे झाल्याची मुलगी जोआ मोरानीनं केली पुष्टी, म्हणाली- ‘सगळे सुखरूप आणि निरोगी होऊन घरी आलो’

पोलिसनामा ऑनलाइन –अलीकडेच असं समजलं होतं की, बॉलिवूड प्रोड्युसर करीम मोरानी यांचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर घरवाल्यांची चिंताही वाढली होती. यानंतर आता मात्र ते कोरोनावर मात करत सुखरूप घरी आले आहेत. त्यांचे शेवटचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत याची पुष्टी त्यांची मुलगी जोआ मोरानी हिनं केली आहे. जोआला देखील कोरोना झाला होता ज्यातून तीही मागेच बरी झाली आहे. तिनं एक पोस्ट लिहित वडिल करीम मोरांनी यांनी कोरोनाचा लढा जिंकला असल्याचं सांगितलं आहे. कुटुंबात प्रत्येकजण आता हेल्द आहे असंही ती म्हणाली आहे.

जोआ आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “आपली पूर्ण फॅमिली आता कॉविड 19 निगेटीव्ह आहे. माझे वडिलही लास्ट नाईट कोरोनामुक्त होऊन घरी आले आहेत. त्यांचीही ट्रीटमेंट संपली आहे. आमच्यापैकी प्रत्येकजण आता निरोगी आहे.

पुढे आपल्या पोस्टमध्ये जोआ म्हणते, “आम्हाला प्रत्येकाला यात वेगवेगळी लक्षणं होती आणि वेगवेगळे अनुभव आले.
माय फादर- कोणतीही लक्षणं नाहीत(9 दिवस हॉस्पिटलमध्ये)
बहिण- डोकेदुखी आणि ताप.(6 दिवस हॉस्पिटलमध्ये)
मी- ताप, कफ, थकना, खोकला, श्वास घ्यायला त्रास(7 दिवस हॉस्पिटलमध्ये)”

असं बरंच काही जोआनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोबतच जर कणाला काही त्रास जाणवत असेल तर त्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्लाही तिनं दिला आहे.