रिकव्हरीनंतर 2-3 महिन्यापर्यंत दिसतात Covid-19 ची लक्षणे,ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा दावा

पोलीसनामा ऑनलाईन : कोविड -19 च्या अर्ध्याहून जास्त रुग्णांमध्ये रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही या आजाराची लक्षणे दिसून आली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या नव्या अभ्यासानुसार, कोरोना विषाणूच्या संपर्कानंतर दोन ते तीन महिन्यांपर्यंत रुग्णांना श्वास घेताना त्रास, थकवा, चिंता आणि नैराश्य अशा समस्या उद्भवू शकतात.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी रुग्णालयात अ‍ॅडमिट कोविड -19 च्या 58 रुग्णांवर बराच काळ या आजाराचा परिणाम पाहिला आहे. त्यांना आढळले की, कोरोनो विषाणूमुळे संक्रमित झालेल्या काही रूग्णांचे मल्टीपल ऑर्गेन्स (अवयव) एक असामान्य अवस्थेत आहेत. त्यांच्यात सतत सूज आल्याने ही समस्या काही महिने कायम राहते. या अभ्यासाचे अद्याप अन्य शास्त्रज्ञांनी पुनरावलोकन केले नाही. मात्र, त्याचा आढावा घेण्यापूर्वीच हे आधीपासूनच मेडआरक्झिव्हमध्ये प्रकाशित केले गेले आहे. ऑक्सफोर्डच्या रॅडक्लिफ विभागातील मेडिसिनचे डॉ. बट्टी रमन म्हणाले की, “कोविड -19 शी संबंधित शारीरिक प्रक्रिया अधिक शोधण्याची गरज हे निष्कर्ष दर्शवते.” तसेच, क्लिनिक केयर एक असे मॉडेल विकसित करण्याकडे लक्ष वेधते, ज्याद्वारे रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रूग्णांच्या आरोग्याला मॉनिटर केले जाऊ शकेल.

यूकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च (एनआयएचआर) मध्ये गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ‘कोविड -19’या आजाराचे शरीर आणि मनावर परिणाम करणारी अनेक लक्षणे आहेत. ‘ ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की व्हायरसच्या संसर्गाच्या दोन ते तीन महिन्यांनंतर 64 टक्के रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास होता. 55 टक्के रुग्णांमध्ये थकवा येण्याची लक्षणे दिसली आहेत. कोविड -19 मधील 60 टक्के रुग्ण एमआरआय स्कॅनवरून असामान्य स्थितीत आढळले आहेत. मूत्रपिंडात 29%, हृदयात 26% आणि यकृतात 10% बदल आहेत. डॉ. रमन म्हणाले, ‘अवयवांमध्ये दिसणारे हे असामान्य इनफ्लेमेशन सीरम मार्करशी संबंधित आहेत. हे रुग्णांमध्ये तीव्र दाह आणि अवयवांना होणारे नुकसान यांच्यातील संबंध दर्शवते.

दरम्यान जगभरात कोरोनाचे 4 कोटीहून अधिक केसेस नोंदविले गेले आहेत. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत 11 लाख 22 हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. 20 ऑक्टोबरपर्यंत भारतात कोरोनाची 7,48,499 सक्रिय प्रकरणे आहेत. देशात कोरोनामुळे एक लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत.