Coronavirus : लोकांचे सातत्यानं प्राण जात असल्यानं भडकली अमेरिका, चीनला शिक्षा देण्याची तयारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचे युद्ध जगभर सुरूच असून अमेरिका सतत या विषाणूबाबत चीनला दोष देत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही जागतिक आरोग्य संघटनेवर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांना वाटते की हा प्राणघातक विषाणू चीनमधील वुहान लॅबमधून आला आहे. दरम्यान अमेरिकेत मृत्यूमुळे नाराज ट्रम्प प्रशासनाने आता चीनला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस महामारीसाठी अनेक मोर्चांवर चीनला शिक्षा देण्यासाठी ट्रम्प प्रशासन दीर्घकालीन योजना तयार करत आहे, ज्यात अनेक कठोर पावले उचलण्याचा विचार केला जात आहे.

चीनमधील निर्बंधासह इतरही अनेक पावले अमेरिकेद्वारे उचलली जाऊ शकतात, असे प्रशासनाच्या आतील सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये अमेरिकेची कर्तव्ये रद्द करणे आणि नवीन व्यापार धोरणे तयार करणे यासारख्या उपायांचा समावेश आहे. या सर्वांखेरीज चीनच्या प्रकरणांमध्ये जिथे जिथे अमेरिकेची भूमिका आहे तेथे सर्व ठिकाणांबाबत अमेरिका विचार करत आहे.

अहवालानुसार, प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की आम्हाला पुन्हा अर्थव्यवस्था सुधारायची आहे, आम्ही ते कसे करणार याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. मात्र चीनला त्यांची कामे पूर्णपणे निंदनीय आहेत असा धडा शिकवण्याचे मार्ग आम्हाला शोधायचे आहेत. मात्र ते कधी व कसे होईल याबाबत काही सांगितलेले नाही.

गुप्तचर विभागावरही दबाव
दुसरीकडे प्रशासनाकडून गुप्तचर विभागावर चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून हा विषाणू आला आहे की नाही हे शोधण्यासाठी खूप दबाव आहे. त्याचा शोध शक्य तितक्या लवकर लावण्यासाठी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सतत दबाव पडत आहे.

पण एका अभूतपूर्व निवेदनात गुप्तचर विभागाने निश्चितपणे म्हटले आहे की आम्ही या प्रकरणात संसाधने वाढवत आहोत कारण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत हे करायचे आहे. United States Intelligence Community ने आपल्या निवेदनात हे देखील म्हटले की आम्ही सूचनेची काटेकोरपणे तपासणी करत आहोत. जेणेकरुन हे कळू शकेल की चीनने हे काम संक्रमित प्राण्यांच्या माध्यमातून किंवा वुहानमधील प्रयोगशाळेद्वारे केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा मुद्दा निवडणुकीशी जोडला
दुसरीकडे ट्रम्प सतत चीनवर हल्ला करत असताना त्यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, चीनला त्यांना पुन्हा अध्यक्ष रूपात पाहायचे नाही कारण अमेरिका त्यांच्या व्यापार कराराच्या माध्यमातून मोठा फायदा घेत आहे. सोबतच ट्रम्प यांनी आपले विरोधी उमेदवार जो बिडेन यांच्यावर निशाणा साधत म्हटले की चीनला ‘स्लीपी जो बिडेन’ यांना बघायचे आहे.

ट्रम्प प्रशासनाला याचीही भीती आहे की, चीनचे रणनीतीक आव्हान आणि प्रशासनातील वाढती परस्पर शंका यांच्यात अमेरिका-चीन संघर्ष वाढत आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा कार्यकाळ वाचवणे कठीण होईल.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की मला पूर्ण विश्वास आहे की चीनी कम्युनिस्ट पक्षाने जे काही केले, त्याची एक किंमत चुकवावी लागेल आणि अमेरिकेशी तर निश्चितच चुकवावी लागेल.

एकूणच चीनच्या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीही झाले तरी अमेरिकेला आता चीनला उत्तर द्यायचे आहे, मग ते रणनीतीक असो किंवा आर्थिकदृष्ट्या.