दिग्गज क्रिकेटर लसित मलिंगा १० वर्षापासून घरापासून ‘वंचित’, आई-वडिल करतात ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्ध २६ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर मलिंगा क्रिकेटला गुडबाय करणार आहे. मलिंगाचा समावेश बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी करण्यात आला आहे. श्रीलंका या मालिकेत तीन एकदिवसीय सामने खेळणार असून पहिल्या सामन्यानंतर मलिंगा निवृत्त होणार आहे. आर प्रेमदासा स्‍टेडियम वर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात मलिंगा निवृत्ती स्वीकारणार आहे.

cricket, lasith malinga, sri lankan cricket team, क्रिकेट, लसित मलिंगा, श्रीलंकाई क्रिकेट टीम

मात्र आपल्या वेगवान आणि अचूक यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने मागील दहा वर्षांपासून आपल्या घरात पाऊल ठेवलेलं नाही. त्याचबरोबर त्याचे आईवडील आजही गरिबीत जीवन जगत आहेत. गाले शहरातील रथगामा गावात मलिंगाचे एकमजली घर असून हे घर अगदी साधारण नागरिकांसारखे आहे. मलिंगाचे आई वडील या घरात राहत असून आजदेखील त्याची आई शिलाईचे काम करत आहे. याविषयी बोलताना ते म्हणतात, आम्ही आमचे कपडे देखील स्वतःच शिवतो आणि हे काम आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.

दस साल से घर नहीं गए लसित मलिंगा, सिलाई करके जिंदगी बिता रहे मां-बाप

दहा वर्षांपासून घरी आला नाही मलिंगा

मलिंगाविषयी बोलताना त्याच्या आईने सांगितले कि, मागील चार महिन्यांपासून मी त्याला पाहिलेले नाही. मात्र मी खुश आहे, या सगळ्याची आता सवय झाली आहे. मागील दहा वर्षांपासून मलिंगा या ठिकाणी आला नसून तो आपल्या कामात तो खूप व्यस्त असतो. तो जिथे आनंदी आहे तिथे आम्ही देखील आनंदी आहोत. त्यामुळे आम्हाला काहीही त्रास नाही. मी मागील काही दिवसांपूर्वी कोलंबोला गेले होते. या ठिकाणी माझा तिसरा मुलगा देखील राहतो.

आरोग्यविषयक वृत्त –