गौप्यस्फोट ! टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला ‘नमाज’ पठणाच्यावेळी मिळालं आयुष्यातील सर्वात मोठं ‘गिफ्ट’

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील आपले पहिले स्थान अबाधित ठेवले असून भारताने या विजयासह आफ्रिकेला 3-0 असा व्हाईटवॉश दिला.

या कसोटीत कुलदीप यादव याच्या जागी संधी मिळालेल्या शाहबाज नदीम याने भारतासाठी कसोटी पदार्पण केले. या सामन्यात कुलदीप यादव खेळणार हे जवळपास नक्की होते, मात्र अचानक त्याला दुखापत आल्याने शाहबाज नदीम याला संधी देण्यात आली. या सामन्यात त्याने चार विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

ADV

त्यानंतर आता त्याने मोठा खुलासा केला आहे. नदीम याच्यासाठी हा सर्वोच्च क्षण होता. कारण घरच्या मैदानावर त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली होती. स्थानिक पातळीवर आणि देशांतर्गत सामन्यांत उत्तम कामगिरी केल्याने त्याला देशाकडून खेळण्याची संधी दिली. मागील 15 वर्षांपासून तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळात असून यामध्ये त्याने 400 हुन अधिक विकेट घेतल्या आहेत.

अशाप्रकारे मिळाली संघात जागा
30 वर्षीय नदीम याने भारतीय संघाच्या शानदार विजयानंतर बोलताना सांगितले कि, माझी भारतीय संघात निवड झाल्याचा मला निरोप आला त्यावेळी मी नमाज वाचत होतो. दुपारी अडीचच्या दरम्यान मला फोन आला होता. मी प्रचंड प्रमाणात भावुक आणि उत्साहित झालो होतो. सुरुवातीचे तीन चेंडू टाकताना मी थोडा नर्व्हस होतो. त्यानंतर मी रुळलो. त्याचबरोबर हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि भावनिक क्षण असल्याचे देखील त्याने म्हटले.

Visit : Policenama.com