WI च्या विरोधात कोहलीला ‘विराट’ धावा करणं गरजेचं, ‘ही’ 5 पावलं उचलली नाही तर ‘सिरीज’ गमवावी लागेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणी विचार केला नसेल की वेस्टइंडिजच्या विरोधात तीन मोठ्या वनडे सीरीजची सुरुवात टीम इंडिया पराभवापासून करेल. भारतीय क्रिकेट संघाला चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात 8 विकेटने पराभव स्विकारावा लागला. आता बुधवारी भारतीय संघाकडे हिशोब चूकता करण्याची संधी आहे. विशाखापट्टनम मध्ये दुपारी 2.30 वाजता सामना सुरु होईल. ही सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. कारण जर या हार स्वीकारावी लागली तर संपूर्ण सीरीज हातातून जाणार. वेस्टइंडिज बरोबर जिंकणं तेवढं सोपं नाही. विशाखापट्टनमच्या मैदानाबद्दल सांगण्यात येत आहे की येथे मोठ्या धावांचा डोंगर उभारता येईल. 300 पेक्षा जास्त धावा होतील. वेस्टइंडिजचे फलंदाज हेटमायर आणि शे होप जबरदस्त फॉर्मात आहेत.

मागील वर्षी भारतीय संघ विशाखापट्टनम मध्ये मैदानात 321 धावा बनवून देखील विजयी होऊ शकली नव्हती. वेस्टइंडिजन ही मॅच टाय केली. या सामन्यात शे होपने 123 आणि हेटमायर ने 64 चेंडूत 94 धावा केल्या. यामुळे हे स्पष्ट आहे की भारतीय संघाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी विराट कोहलीला 5 निर्णय घेणे महत्वाचे ठरेल.

1. योग्य संघाची निवड –
चेन्नईत वनडेमध्ये भारतीय संघाचा पराभवाचे कारण आहे संघाची निवड. विराट कोहली 5 फलंदाजांसह, 2 ऑलराऊंडर आणि 4 गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरला होता. त्यामुळे 287 च्या लक्षापर्यंत पोहचणे संघाला अवघड गेले. आता ही चूक विशाखापट्टनमच्या मैदानात कोहलीला सुधारावी लागणार आहे. 5 गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागणार आहे, जडेजा किंवा शिवम दुबेपैकी एकाला प्लेइंग इलेवनमधून बाहेर बसवावे लागेल.

2. कुलदीप आणि चहलला सोबत संधी –
ही जोडी एकत्र खेळणं आवश्यक आहे. हे दोन्ही गोलंदाज मिडिल ओवर्समध्ये विकेट घेऊ शकतात. या दोघांची फिरकी वेस्डइंडिजला भारी पडू शकते. मागील सामन्यात या दोघांनी चार विकेट घेतले होते.

3. झेल पकडा, सामना जिंका –
टी – 20 सिरिज असेल किंवा वनडे सीरिज. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खराब होत चालले आहे. विराट आणि संघाला जगभरातील क्षेत्ररक्षणात उत्तम मानणे जाते. परंतु मागील काही दिवसांपासून संघातील फिल्डिंग खराब होत चालली आहे. चेन्नईमध्ये हेटमायरने अत्यंत महत्वाचा झेल सोडला होता. परिणाम हा झाला की वेस्टइंडिजचा संंघ विजयी झाला. त्यामुळे क्षेत्ररक्षणावर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.

4. धावा बनवणे आवश्यक –
कोहली, रोहित आणि राहुल यांच्याकडून धावा बनवणे आवश्यक आहे. पंत, अय्यर आणि जाधव हे चांगले फलंदाज आहेत, परंतु भारतीय संघाचे जास्त धावा होणं आवश्यक आहे. चांगली बाब ही आहे की विशाखापट्टनममध्ये कोहलीची बॅट जोरदार धावा काढते. कोहलीने 5 सामन्यात 139 च्या सरासरीने 556 धावा काढल्या. विराट या मैदानावर कधीही 50 पेक्षा कमी धावांनी बाद झाला नाही. त्याने विशाखापट्टनममध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतक केले आहेत. कोहलीने या मैदानावर वेस्टइंडिजच्या विरोधात 186 धावा केल्या आहेत.

5. नशिबाची साथ आवश्यक –
कोहलीने जर योग्य संघ निवडला. फलंदाजी, गोलंदाजी नीट झाली तर धावा देखील उत्तम होतील. त्यावर जय पराजय अवलंबून आहे. टॉस जिंकने विराटसाठी महत्वाचे आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडणे विराटासाठी फायदेशीर असेल. या मैदानात 8 पैकी 5 सामने संघाने जिंकले आहेत, तर एक मॅच टाय झाली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/