IPL 2020 लिलावापुर्वीच 639 खेळाडू OUT, भारतीयांमध्ये रॉबिन उथप्पा TOP ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2020 लिलावासाठी 332 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे, लिलाव 19 डिसेंबर रोजी कलकत्त्यात होणार आहे. या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नावे दिली होती त्यातील 639 खेळाडूंची नावे यादीतून वगळण्यात आली. यानंतर निवडलेल्या खेळाडूंची नावे प्रत्येक संघाकडे पाठवण्यात आलेली आहे. यामध्ये 19 अशा भारतीयांची नावे आहेत जे अद्याप आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत त्यासोबतच 24 नवीन खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

यावेळी रॉबिन उथप्पा हा खेळाडू सर्वात महागडा आहे. 1.5 कोटी रुपयांच्या पुढे उथप्पा यांच्यावर बोली लागणार आहे. गेल्या दोन सीझनमध्ये जयदेव उनादकट या खेळाडूची बेस किमंत 1 कोटी रुपयांपासून पुढे सुरु झाली होती.

केसरिक विलियम्‍स देखील लिलावात सामील
निवडलेल्या खेळाडूंमध्ये केसरिक विलियम्‍स. मुश्फिकुर रहीम आणि एडम जंपा अशी नवीन नावे देखील आहेत. केसरिक विलियम्‍स हा नुकत्याच झालेल्या वेस्टइंडीज सिरीज दरम्यान चर्चेत आलेला खेळाडू आहे त्याच्यामध्ये आता विराट कोहलीमध्ये मैदानावर चांगलीच ठिणगी उडाल्याचे सर्वांनी पाहिले होते.

ग्‍लेन मैक्‍सवेल याच्यासाठी बोली लावण्यामध्ये खूप चढाओढ पहायला मिळू शकते. त्याची किंमत 2 कोटींपासून सुरु होते.

या खेळाडूंकडे असेल सगळ्यांचेच लक्ष
आपला संघ जिंकावा यासाठी चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतील यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज क्रिस लिन, एरोन फिंच इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय यांच्याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

भारतीय खेळाडूंपैकी आक्रमक फलंदाज म्हणून अंडर 19 मधील जायसवाल, विराट सिंह असे खेळाडू आहेत. तर आर साई शंकर सारखा फिरकीपटू आणि जी पेरियास्‍वामी हा गतिशील गोलंदाज देखील यावेळी आयपीएलमध्ये झळकणार आहे.

सगळ्यात आधी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा लिलाव पार पडेल त्यानंतर भारतीय खेळाडूंचा लिलाव संपन्न होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/