CSK ला आणखी एक धक्का ! रैनानंतर आता हरभजन सिंग ही IPL 2020 खेळणार नाही

पोलिसनामा ऑनलाइन : आयपीएल सुरू होण्यासाठी थोडा वेळ बाकी राहिला असताना चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणी वाढत आहेत. कोरोनानंतर आता एक-एक संघातील स्टार खेळाडू आयपीएलचा सध्याचा सीजन न खेळण्याचा निर्णय घेत असल्याच दिसत आहेत. सुरेश रैना नंतर चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगही आयपीएलच्या 13 व्या सत्रातून बाहेर पडला आहे. हरभजनने वैयक्तिक कारणे सांगून या सीजनमधून स्वत: ला दूर केले आहे आणि हरभजन सीएसके बरोबर युएईला पोहोचला ही नाही.

युएईला रवाना होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चेपुक येथे पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर होते. हरभजन सिंग आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा तेथे पोहोचले नाहीत. जडेजा संघासह युएईला पोहोचला, तर हरभजनसिंग भारतात असताना त्याने वैयक्तिक कारण सांगून यंदा आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.