14 टीमकडून खेळणार्‍या ‘या’ क्रिकेटरनं घेतली निवृत्ती, म्हणाला – ‘आता खेळण्यात काही अर्थ नाही’

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – साऊथ आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जेपी ड्युमिनी (JP Duminy ) ने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातुन निवृत्ती घेतली आहे. सोमवारी, ड्युमिनीने जाहीर केले की तो यापुढे फ्रँचायझी क्रिकेट देखील खेळणार नाही. या निर्णयामागील इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे डुमिनी यांनी नमूद केले.याबाबत बोलताना ड्युमिनी म्हणाला की, तो टी २० खेळण्याकरिता युवा खेळाडू आहे. त्याला याकरिता भरपूर पैसे देखील मिळू शकतील मात्र आता खेळण्यामागे कोणताही हेतू दिसत नाही असे तो म्हणाला. ड्युमिनी ने सांगितले की आता तो बाहेरील टीमला मदत करेल.

ड्युमिनी कोच बनणार ?

यापूर्वी ड्युमिनी यांनी जगभरातील १४ टीम्स चे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने इंडियन प्रीमियर लीग, कैरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपरलीग, बिग बैश लीग यासोबतच जगभरातील इतरही मोठ्या लीग मध्ये सहभाग घेतला आहे. आता त्याने क्रिकेट मैदानाबाहेरील जबाबदारी घेण्याबाबत म्हटले आहे. विश्वचषकानंतर ड्युमिनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले होते, परंतु त्याने फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळणे सुरूच ठेवले. ग्लोबल टी -20 लीग आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने बार्बाडोस ट्रायडर्ससाठी चांगली कामगिरी केली. त्याच्या करिअरची वाटाचल पाहता तो कोच बनणार अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुखापतीनंतर झाला मार्गदर्शक

म्जांसी सुपर लीग दरम्यान, तो जखमी झाला आणि त्याला पार्ले रॉक्सच्या संघातून वगळण्यात आले. दुखापत झाल्यानंतर, ड्युमिनी हा एक मार्गदर्शक म्हणून पार्ले रॉक्सशी संबंधित होता आणि संघाने देखील जेतेपद जिंकले. कदाचित यामुळेच आता ड्युमिनीने पूर्णपणे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्युमिनीची कारकीर्द :

*दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक टी २० धावा करणारा ३५ वर्षीय ड्युमिनी खेळाडू आहे.
*त्याने ८१ टी -२० सामन्यात ३८.६८ च्या सरासरीने १९३४ धावा केल्या आहेत.
*त्याच्या फलंदाजीमधून एकूण ११ अर्धशतके झाली आहेत.
*त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेकडून ड्युमिनीने १९९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०००हून अधिक धावाही केल्या आहेत.
*डाव्या हाताच्या या फलंदाजाने ४६ कसोटी सामन्यात २१०३ धावा केल्या.
*ड्युमिनीच्या फलंदाजीने १० आंतरराष्ट्रीय शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like