प्रशिक्षकांचे मोठे विधान ! IPL रद्द झाल्यानंतरही धोनी T-20 विश्वचषक खेळणार !

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – वर्ल्‍ड कपनंतर क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय विकेटकीपर फलंदाज एमएस धोनी आयपीएलच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर मैदानावर परतणार होता, पण कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे आयपीएल15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमध्ये परत येण्याची शक्यता दिसत नाही, परंतु त्याचे बालपणाचे प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांना आशा आहे की, तो भारताच्या टी -20 विश्व कप टीममध्ये आपली जागा करेल.

आयपीएलची सुरुवात 29 मार्च रोजी होणार होती पण कोरोना व्हायरसच्या साथीमुळे 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान पुढे जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या विश्व कप सेमीफाइनलमध्ये भारत पराभूत झाल्यानंतर धोनी क्रिकेटपासून दूरच होता.

धोनीची स्थिती कठीण
बॅनर्जी यांनी रांची येथील प्रेस ट्रस्टला सांगितले की, ‘सध्याच्या परिस्थितीत आयपीएल होण्याची चिन्हे दिसत नाही. आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. धोनीची परिस्थिती कठीण आहे पण मला असे वाटते की, त्याला टी -20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळेल जे त्याचे शेवटचे विश्वचषक असेल. धोनी चेन्नईहून परत आल्यानंतर मी त्याच्याशी चर्चा केली आणि मी सतत त्याच्या पालकांशी संपर्क साधत आहे. तो फिटनेस प्रशिक्षण घेत आहे आणि पूर्णपणे तंदुरुस्त आहे.’

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यापूर्वी सांगितले होते की, धोनीचे भविष्य आयपीएलद्वारे ठरवले जाईल. आयपीएल पुढे ढकलताच सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग सारख्या दिग्गजांनी दोन वेळा विश्वचषक विजेता कर्णधारच्या परत येण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. बॅनर्जी म्हणाले की, गेल्या वर्षी जुलैपासून त्याने कोणतीही टूर्नामेंट खेळली नाही, परंतु त्याच्याकडे 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. ते म्हणाले की, रांचीमध्ये सर्व काही बंद आहे, परंतु तो घरी फिटनेस प्रशिक्षण घेत आहे. त्याच्याकडे एक जिम, बॅडमिंटन कोर्ट आणि रनिंग कॉरिडोर आहे.

वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर तो घरगुती सत्रासाठी टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र, आयपीएलमध्ये परतण्याची तयारी त्याने आधीच सुरू केली होती. त्याने रांची येथे घरच्या संघाबरोबर सराव केला. यावेळी त्याने टेनिस स्पर्धा आणि गोल्फ देखील खेळला.