दहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार दहशतवादाविरोधात कडक पाऊले उचलताना दिसत आहे. त्यामुळेच आता संपूर्ण देशभरात दहशतवादी कारवायांसंदर्भात होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहखात्याने टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (TMG ) स्थापना केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने अशाप्रकारचे वृत्त दिले आहेत.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस उपमहासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली या नव्या टेरर मॉनिटरिंग ग्रुपची (टीएमजी) स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये गुप्तचर यंत्रणा (आयबी), राष्ट्रीय तपास पथक (एनआयए), केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सेन्ट्रल बोर्ड ऑफ टॅक्स अँड कस्टम्स (सीबीआयसी), सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) या संस्थांचे प्रतिनिधी हे या ग्रुपचे सदस्य म्हणून काम पाहतील. मोदी सरकार दशतवादाला तोंड देण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहे. त्या उपायांचा एक भाग म्हणूनच या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

You might also like