कुत्र्याला हाकलले ; ‘त्यांनी’ दोघांवर केले कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना प्राण्यांविषयी खूप प्रेम असते. कोणी एखाद्या प्राण्याला साधे हकलले तरी त्यांना सहन होत नाही. त्यांचा पारा चढतो आणि ते काहीही करुन बसतात. केवळ कुत्र्याला हकलल्याने त्यांनी दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना जबर जखमी केल्याची घटना कोरेगाव पार्कमध्ये घडली आहे. त्यांना आता पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे.

विजय महिपत सपकाळ (वय ४०), जय संजय सपकाळ (वय २२, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा – माॅलमध्ये शिरला बिबट्या ; परिसरात खळबळ 

याप्रकरणी अजित अशोक रणदिवे (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. १९ फेब्रुवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रणदिवे हे त्याचा मित्र सिद्धार्थ घायतडक यांच्याबरोबर कोरेगाव पार्क येथील साईबाबा मंदिरासमोरील रोडवरुन जात होते. यावेळी तेथील कुत्रा त्यांच्या अंगावर आला. त्यामुळे रणदिवे यांनी कुत्र्याला हाकलले. यावरुन विजय सपकाळ व इतरांना रांग आला. त्यांनी रणदिवे व सिद्धार्थ घाततडक यांना शिवीगाळ करुन कोयत्याने डोक्यात, तोंडावर, हातावर व पायावर मारहाण करुन जबर जखमी केले. रणदिवे यांची मोटारसायकल फोडून त्याचे नुकसान केले.