Crime News | क्राईम पेट्रोल पाहून 5 वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crime News | गुजरातच्या राजकोटमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाचवीच्या विद्यार्थिनीने क्राईम पेट्रोल (Crime Petrol) पाहून आत्महत्या केल्याचे समोर आले. कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीगी नेहमी क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया पाहायची. त्यातूनच तिने आत्महत्या करण्याची पद्धत पाहिली असेल असा दावा केला आहे. या संदर्भात एका हिंदी वेबसाईटने वृत्त दिले आहे. (Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिलाही त्यांनी सोबत जाण्यासाठी सांगितले होते. मात्र, तिने येण्यास नकार दिला होता. कार्यक्रम संपल्यानंतर कुटुंबीय ज्यावेळी दुपारी घरी परतले त्यावेळी मुलीच्या रूमचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी दार उघडण्यासाठी दरवाजा ठोकला, पण आतून मुलीने काहीच प्रतिसाद आला नाही. रुममधून कोणताही आवाज येत नव्हता. त्यानंतर खिडकीतून रूमच्या आता कुटुंबीयांनी डोकावले असता त्यावेळी त्यांना मुलगी सिलिंगच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. त्यांनी रुममध्ये प्रवेश करत तिला तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात नेहले पण डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मुलीच्या एका चुलत बहिणीने दिलेल्या माहितीनुसार मुलीला सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोले पाहणं खूप जास्त आवडायचं. ती दिवस दिवसभर सिरियल्स पाहायची त्यातूनच तिने आत्महत्या कशी करायची हे पाहिलं असेल. मुलीच्या आत्महत्येसंदर्भात पोलिसांनी अनेकांडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. (Crime News)

 

Web Title :- Crime News | class 5th girl student committed suicide after watching crime patrol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aba Bagul | 50 लाख ते 1 कोटी पर्यंत थकबाकी असणारे 385 मिळकत धारक कोण? यांचे भाजपशी काय हितसंबंध, काँग्रेस पक्षनेते आबा बागूल यांचा सवाल

Pune Corporation | पुणे महापालिकेची मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना ! शास्तीच्या रकमेत मिळणार 75 % सवलत पण…

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 40 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Corporator Patil Archana Tushar | नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश ! कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत; स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

अवघे 37 हजार देऊन घरी आणा जास्त मायलेजची Maruti Alto 800, केवळ इतका होईल EMI