हुंड्यासाठी सुनेच्या गुप्तांगात टाकली ‘ब्लेड’ आणि ‘माचीस’, शरीरावर जागोजागी कापले

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात माणुसकीला लाजवणारे प्रकरण समोर आले आहे, जिथे सासरकडच्यांनी हुंड्याच्या लोभामुळे माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लग्नाच्या केवळ १३ दिवसानंतरच सुनेच्या शरीराला जागजागी ब्लेडने कापले आणि इतकेच नाही तर तिच्या गुप्तांगात ब्लेड आणि माचिसचे तुकडे टाकले. या अत्यंत असह्य वेदना झेलणाऱ्या विवाहितेने आपल्या माहेरी या घटनेची माहिती दिली.

गुप्तांगात टाकले ब्लेड
याची माहिती मिळताच पीडितेचे कुटुंब घरी आले आणि तिला चकिया प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पीडितेला एसकेएमसीएच येथे रेफर केले गेले. बुधवारी सायंकाळपासून पीडिता एसकेएमसीएच्या गॉयनिक विभागात भरती आहे. डॉक्टरांनी पीडितेच्या गुप्तांगातून ब्लेड आणि माचीस काढून टाकले आहे.

बाईक आणि पैशांची करत होते मागणी
संसर्गामुळे विवाहितेची प्रकृती अद्याप बरी झालेली नाही. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे चकिया पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी विवाहितेचा नवरा आणि सासरा याला अटक केली. पीडितेच्या भावाने सांगितले की, २३ जून रोजी बहिणीचे लग्न बरुराज पोलिस स्टेशन परिसरातील हथलुआमठ गावात झाले होते. त्यानंतर मुलाने एक लाख रुपये आणि बाईकची मागणी करण्यास सुरवात केली होती.

सुनेची प्रकृती अद्यापही गंभीर
पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने आणि त्याच्या कुटुंबियांनी पीडितेचा छळ सुरु केला. चकिया पीएचसीमध्ये ब्लेडचे ३ तुकडे काढल्यानंतर डॉक्टर म्हणाले की, आता हे प्रकरण इथे हाताळले जाणार नाही, एसकेएमसीएचला घेऊन जा. एसकेएमसीएच येथे उपचार सुरू आहेत.