पिस्टलसह गुन्हेगार अटकेत, तळेगाव पोलिसांची कामगिरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – सापळा रचून अटक केलेल्या गुन्हेगाराकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि काडतुस असा एकूण २५ हजार २०० रुपयांचा ऐवज तळेगाव पोलिसांनी जप्त केला आहे.
गणेश नारायण घुले (३४, रा. केशवनगर, वडगाव) याला अटक केली आहे.

एक तरुण हद्दीत आला असून त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील, निरीक्षक वाघमोडे, तपासी पथकाचे प्रमुख डी. बी. बाजगिरे यांच्या पथकाने सापळा रचून घुले याला ताब्यात घेतला.

घुले याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतुस आढळून आल्याने त्याला अटक केली आहे. तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like