सराईताला ‘वाढीव’पणा नडला, हातात कोयता घेऊन टिक टॉक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – परिसरात दहशत पसरविण्यासाठी हातात कोयता घेऊन टिक-टॉक व्हिडीओ करण्याचा वाढीवपणा एका गुन्हेगाराला चांगलाच नडला. ‘वाढीव दिसताय राव’… या लावणीवर हातामध्ये कोयत्यासारखे हत्यार घेऊन टिक टॉक व्हीडीओ करणाऱ्या या सराईताला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दीपक आबा दाखले (२३, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

वाढीव दिसताय राव ….लावणीवर टिक टॉक
दीपक दाखले हा पिंपरीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याने परिसरात दहशत पसरविण्यासाठी हा व्हिडीओ केला. हातामध्ये कोयत्यासारखे (पालघन) हत्यार घेऊन एका घरातून बाहेर येताना या व्हिडीओमध्ये दिसतो आहे. या व्हिडीओचे चित्रिकरण वाढीव दिसताय राव… या लावणीवर करण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओ पोलिसांच्या हाती आणि ठोकल्या बेड्या
हा ‘वाढीव व्हिडीओ’ वाकड पोलिसांच्या तपास पथकातील हरीष माने यांच्या हाती लागला. त्यांनी तात्काळ दाखले याला पकडण्याचे आदेश दिले. त्यानंतर तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला राहत्या घराजवळ सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेले हत्यार देखील जप्त करण्यात केले.

You might also like