चार जणांचा खून करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे पत्नीसह सासू, मेहुणी, मेव्हण्याचा खून करुन फरार झालेल्या मुख्य संशयिताला सांगली शहर वाहतूक पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतेले. आरोपीला शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुख्य आरोपीला पकडण्यासाठी सांगली शहर पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. अखेर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला सांगलीवाडीतून आज (शनिवार) सायंकाळी चारच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7b84fbd-c97b-11e8-ae84-554935d992c5′]

प्रदीप विश्‍वनाथ जगताप (रा. कवठेगुलंद, ता. शिरोळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्य संशयिताचे नाव आहे.
प्रदीप सांगलीवाडीतील त्याच्या बहिणीकडे आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यांनी वाहतूक पोलिसांसोबत सांगलीवाडीतील प्रदीपच्या बहिणीच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर पोलिसांना पाहून तो पळून गेला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने यड्राव येथे चौघांचा खून केल्याची कबुली दिली. नंतर त्याला पकडल्याची माहिती शहापूर पोलिसांना देण्यात आली. सायंकाळी त्याला शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
[amazon_link asins=’B00YEJYSEM,B00YEJZVRU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca9717d8-c97b-11e8-94cd-f72d31df103a’]

पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, महेंद्र साळुंखे, जयवंत पवार, निवास कांबळे, वाहतूक शाखेचे विठ्ठल चव्हाण, प्रशांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. यड्राव येथील घटनेनंतर जखमी रोहित आयरेकर-धुमाळ, सोनाली अभिजित रावण, रूपाली श्रीपती आयरेकर-धुमाळ यांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. यातील रोहितचा वाटेतच मृत्यू झाला. तर सोनाली आणि रूपाली यांच्या उपचार सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दारुचा परवाना मागितल्याच्या करणावरुन पोलिसाला मारहाण

यड्राव येथील हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांचाच मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. यातील सोनालीचा म्हैसाळ (ता. मिरज) येथील अभिजित रावण याच्याशी विवाह झाला होता. त्यांना पाच महिन्यांची मुलगी आहे. रविवारी (दि.७) तो पत्नीसह मुलीला आणण्यासाठी यड्रावला जाणार होता. मात्र त्याआधीच पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याशिवाय आयरेकर-धुमाळ कुटुंबातील १६ वर्षांचा एकच मुलगा या हल्ल्यातून वाचला असून तोही दिवसभर सिव्हील परिसरात होता. या घटनेमुळे तोही पूर्णपणे हादरून गेल्याचे दिसत होते.

जबरी चोर्‍या करणार्‍यांच्या बुलढाणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरम्यान, मृतांचे नातेवाईक सकाळी सात वाजल्यापासून सांगलीतील शासकीय रूग्णालय परिसरात थांबून होते. शहापूर पोलिसांकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना कसलाच प्रतिसाद दिला जात नव्हता. त्याशिवाय सर्व मृतदेह पोलिस ठाण्यात नेल्यानंतरच ताब्यात देऊ असेही पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले होते. त्यामुळे सोनाली रावणचे नातेवाईक हतबल झाले होते. पोलिसांच्या असहकार्यामुळे  उशीरा मृतदेह ताब्यात मिळाल्याने मृत सोनालीवर यड्राव येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याचे नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.