तडीपार सराईताला अटक करून २४ तासात दोषारोपपत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तडीपारीच्या काळात पुर्वपरवानगी न घेता शहरात आलेल्या एका सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्यावर २४ तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

शाहरुख वसीम खान (२१, अऱण्येश्वर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडील पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी ते अरण्येश्वर कमानीजवळ असताना त्यांना शहरातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार शाहरुख खान तेथे थांबलेला दिसला. त्याला परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त यांनी शहर व जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. त्याने शहरात येण्यासाठी पुर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. त्यामळे तो पोलिसांना पाहून पळू लागल्याने त्याला पोलिसांनी जागीच पकडले. त्यानंतर त्याच्याकडे तडीपार असताना कोणाची परवानगी घेतली आहे का याची विचारणा केली. परंतु त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि लागलीच त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

ही कारवाई परिमंडळ तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, कर्मचारी रविंद्र फुलपगारे, महेश गाढवे, अमित बोडरे, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, अक्षयकुमार वाबळे, अमोल लोहार यांच्या पथकाने केली.