
‘महाविकास’ आघाडीत खाते वाटपावरून ‘धुसपूस’, अजित पवार आणि अशोक चव्हाणांमध्ये ‘खडाजंगी’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या खाते वाटपामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. आघाडीतील नेत्यांचे खातेवाटपावरून एक मत होताना दिसत नाही. काल रात्री झालेल्या चार तासांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसला काही प्रमुख खाती हवी आहेत त्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये चांगलीच झुंपल्याचे पहायला मिळाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना मोठी खाती हवी आहेत त्यामुळे खाते वाटप रखडल्याचे समजते. काँग्रेसला कृषी खाते हवे आहे. काल झालेल्या चर्चेच्या वेळी अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विषय काढला त्यावर ते मंत्रिमंडळात नाहीत त्यांचा इथे काय संबंध असे अशोक चव्हाण म्हणाले त्यावर तुमचा नेता कोण ते ठरवा मग बोलू असे म्हणताच चव्हाण तेथून निघून गेले अशा प्रकारचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते.
जे पालकमंत्री आहेत त्यांची नावे आज जाहीर होणार आहेत. खाते वाटपाचा निर्णय झाला आहे फक्त काही खात्यावरून मत मतांतर आहेत त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी मतमतानंतर आहेत असे ते म्हणाले अर्थात ही बैठक चांगलीच वादळी झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीसाठी अनुपस्थित होते मात्र त्यांच्याशी फोनवरून एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याचे समजते. तसेच बाळासाहेब थोरात यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खाते बदलाची नवीन यादी दिल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच खातेवाटप होणार असल्याचे सांगितले आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- नियमित खा ‘डोसा आणि सांबर’; हे आहेत 7 आरोग्यदायी फायदे !
- गुलाब पाकळ्यांच्या चहाची वाढती क्रेझ, ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या !
- पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहात ? ‘हे’ 5 उपाय ठरतील फायदेशीर !
- ‘कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ का होतो? जाणून घ्या ९ लक्षणे आणि ६ उपाय
- कोणत्या भाज्या अधिक आरोग्यदायी, ‘हे’ आहेत ६ फायदे
- सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा
- कापूरचे ‘हे’ 7 आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या