पुणे : कमीशनसाठी लुटले कॉसमॉस बँकेचे करोडो रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करुन तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरणाऱ्यांनी कमीशनसाठी ही चोरी केली केल्याचे समोर आले आहे. आरोपींना ९० लाख रुपयांची रक्कम चोरण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये कमीनचे अमिष दाखवण्यात आले होते. एटीएममधून क्लोनिंगद्वारे पैसे काढण्यासाठी प्रत्येक आरोपीला १० ते १५ कार्ड देण्यात आले होते. यामागचा मास्टर माईंड एकच असू शकतो. मात्र, पैसे चोरणारी टोळी मोठी असून पुणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जाहिरात

गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम सेलने मंगळवारी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच जणांची नावे समोर आली अाहेत. मात्र, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

कॉसमॉस बँकेत घालण्यात आलेल्या सायबर दरोड्याचे बऱ्याच दिवसांपासून प्लॅनिंग करण्यात आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे जास्त शिकलेले नाहीत. ते वाहन चालवण्याचा धंदा करतात. त्यांना कमीशनचे अमिष दाखवण्यात आले होते. एटीएममधून पैसे काढण्यासाठी शनिवार आणि रविवार हे दिवस ठरवण्यात आले होते. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने या दोन दिवशी जास्त प्रमाणात रकमेची चोरी करण्यात आली.

‘महाराष्ट्राची सौंदर्य सम्राज्ञी’चे ऑडिशन पुण्यात ! 

ज्या एटीएममधून आरोपींने पैसे काढले त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीत ते कैद झाले होते. तांत्रीक बाबींचा अभ्यास करुन या दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सुरु असून अद्याप या विषयी काही सांगणे योग्य नसल्याचे ही त्यांनी सांगितले.