‘लॉकडाऊन’मध्ये नक्षलग्रस्त गडचिरोलीत अडकल्या लग्नाच्या 2 ‘वराती’, आता CRPF त्यांना देतय दोन वेळेचं ‘जेवण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात तैनात सीआरपीएफची बटालियन जवळपास एका महिन्यापासून अडकलेल्या दोन लग्नाच्या वरातींसह परिसरातील गरजू लोकांना अन्न पुरवित आहे. सीआरपीएफचे युवा सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) सोनू कुमार हे जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर देसाईगंज तहसीलमध्ये वरात्यांची सेवा करत आहेत. त्यांचे 5 एप्रिल रोजी लग्न होणार होते, परंतु त्यांना सुट्ट्या रद्द कराव्या लागल्या आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या वडिलोपार्जित ठिकाणी ते जाऊ शकले नाहीत.

परिस्थिती त्यावेळी अशी झाली जेव्हा 23 मार्चला शेजारच्या भंडारा आणि चंद्रपूर येथील वरात येथे पोहोचल्या. दोन्ही वरातींमध्ये सुमारे 20 लोक होते. विवाहसोहळा पार पडला, पण दुसर्‍या दिवशी बंदची घोषणा झाल्यानंतर वरात परिसरातच अडकल्या. सीआरपीएफच्या 191 बटालियनचे कमांडिंग ऑफिसर प्रभाकर त्रिपाठी यांनी गडचिरोली येथील एका वृत्तसंस्थेला फोनवर सांगितले की, ‘दोन्ही मुलींची कुटुंबे रोजंदारीने कमवून खाणारे लोक आहेत. आम्हाला परिस्थितीबद्दल कळताच आम्ही आमची सर्व संसाधने वापरण्याचा निर्णय घेतला.’

दरम्यान त्यांच्याकडे मर्यादित स्त्रोतांमुळे इतके दिवस लोकांना अन्न पुरविण्याइतके सामान नव्हते. सीआरपीएफ कमांडिंग ऑफिसर यांनी सांगितले की दोन्ही कुटुंबियांच्या शेजार्‍यांनी वरातीस इतके दिवस राहण्यासाठी त्यांच्या घरात आणि काही सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था केली.

सीआरपीएफ कमांडिंग ऑफिसरने सांगितले की, देसाईगंज येथे वरातीमधील लोकांना जेवण बनवण्यासाठी रेशन आणि जेवण बनविणाऱ्यांना पाठवण्यात आले होते, परंतु आसपासच्या भागात राहणाऱ्या इतर लोकांनीही त्यांना रेशन खरेदी करता येत नसल्याने मदत मागितली. त्रिपाठी म्हणाले, ‘आता आम्ही वरातीसह सुमारे 600 लोकांना दिवसातून दोनदा अन्नपुरवठा करीत आहोत. आम्ही आपल्या बांधवांसाठी एवढे तर करूच शकतो, ज्यांच्याबरोबर आपण इतक्या वर्षांपासून जीवन व्यतीत करत आहोत.