अमरावती : मेळघाटात झालेल्या भीषण अपघातात 3 तरूणांचा जागीच मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. क्रुझर गाडी झाडावर आदळून तिघांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाटात परतवाडा धारणी मार्गावर क्रुझर गाडी झाडावर आदळली. या भीषण अपघातात ३ पर्यटकांवर काळाचा घाला तर ४ जण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे अपघातातील सर्व युवक २२ ते २४ वयोगटातील आहेत. लॉकडाऊन दरम्यान हे माळघाट
फिरण्यासाठी गेले होते. पण परतत असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथल्या गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. घटनास्थळावरुन पोलिसांना ३ मृतदेह मिळाले असून ते शवविच्छेदनासाठी नजीकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस या अपघाताची पुढील चौकशी करत आहेत.