Cryptocurrency Miracles-Changpeng Zhao | बर्गर बनवणाऱ्याने आपले घर विकून क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवले, आता मार्क झुकरबर्गपेक्षा ‘श्रीमंत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cryptocurrency Miracles Changpeng Zhao |आपले राहते घर विकून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून मॅकडोनाल्डचे माजी कर्मचारी चांगपेंग झाओ (Cryptocurrency Miracles-Changpeng Zhao) यांना क्रिप्टोकरन्सीने खूप धनवान केले आहे. आज त्यांची संपत्ती मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि गुगलचे संस्थापक लॅरी पेज (larry page) आणि सर्जे ब्रिन (sergei brin) यांच्यापेक्षा जास्त आहे. Binance चे संस्थापक झाओ यांची संपत्ती $96 अब्ज एवढी आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात (Bloomberg Billionaires Index) गेल्या महिन्यातच त्यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत आले आहे. हा श्रीमंत पूर्वी मॅकडोनाल्डमध्ये बर्गर फ्लिकर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर होता. कॅनडाचे नागरिक झाओ (Cryptocurrency Miracles-Changpeng Zhao) यांचा जन्म चीनच्या जिआंगसू प्रांतात झाला. त्यांचे वडील विद्यापीठात प्राध्यापक होते. वयाच्या 12 व्या वर्षी झाओ आपल्या कुटुंबासह कॅनडाला गेले.

क्रिप्टोकरन्सीचा राजा झाओ याना CZ म्हणतात

झाओ यांना क्रिप्टोफाईल्सच्या जगात CZ म्हणून ओळखले जाते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांची लवकरच एक आख्यायिका बनत आहे. तसेच ते अबुधाबीमध्ये रॉयल फॅमिली बरोबर मेटिंग्स व पार्ट्या करत आहेत. त्यांनी दुबईत एक अपार्टमेंट देखील खरेदी केले आहे. तसेच, काही लोकांचे असे मत आहे कि झाओची संपत्ती $ 96 अब्ज पेक्षा जास्त असू शकते. झाओची वैयक्तिक क्रिप्टो होल्डिंग्स त्याच्या संपत्तीच्या गणनेमध्ये विचारात घेतली जात नाहीत.

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अपार्टमेंट विकले

क्रिप्टोमधून पैसे कमवण्याचा मार्ग शांघायमध्ये 2013 पासून, BTC चायना चे तत्कालीन CEO बॉबी ली आणि गुंतवणूकदार रॉन काओ यांच्यासोबत मैत्रीपूर्ण पोकर गेम दरम्यान सुरू झाला. झाओने दोघांनाही त्यांच्या एकूण संपत्तीपैकी १०% बिटकॉइनमध्ये ठेवण्यास प्रोत्साहित केले. काही काळ त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्याचा फायदा घेत बिटकॉइन साठी आपले अपार्टमेंट विकले.

2017 मध्ये Binance ची स्थापना केली

2017 मध्ये झाओनि Binance ची स्थापना केली आणि ते लवकरच क्रिप्टो पॉवर हाऊसमध्ये बदलले. झाओने आपल्या हातावर कंपनीचा लोगोचा टॅटू देखील काढला आहे. झाओ यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितले की बिनन्स मुख्यालयाबाबत लवकरच घोषणा केली जाईल. त्याच्या कायदेशीर फाइलिंगमध्ये, फर्म मध्ये सांगितले आहे कि ते केमन आयलंडमध्ये समाविष्ट केले आहे जे एक ऑफशोअर आणि टॅक्स बचतीसाठी प्रसिद्ध आहे.

Binance टेस्ला आणि अमेझॉनला मागे टाकू शकते

नोव्हेंबरमध्ये, वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले की झाओच्या फर्मची एकूण संपत्ती $300 अब्ज असू शकते.
याचा अर्थ कंपनी टेस्लाचे एलोन मस्क आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांना मागे टाकू शकते.
मस्क 282 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
192 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बेझोस दुसऱ्या स्थानावर आहेत.
Binance Coin गेल्या वर्षी जवळजवळ 1,300% वाढले आहे.

यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस झाओची कंपनी मनी लाँड्रिंग आणि टॅक्स ची चोरी करते का याचाही तपास करत आहे
. गेल्या वर्षी Binance ला कमीत कमी $20 बिलियन रेवेन्यू मिळाला आहे.

Web Title : Cryptocurrency Miracles Changpeng Zhao | changpeng zhao flipped burgers at mcdonalds cryptocurrency changed his fate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

 

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…