KYC पूर्ण करण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पतीच्या पेटीएमचा केवायसी पूर्ण करायचा असल्याचे सांगत त्याची माहिती घेऊन सायबर भामट्यांनी खात्यातून सव्वा दोन लाख रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार ऑगस्ट २०१९ महिन्यात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या गृहिणी आहेत. दरम्यान त्यांच्या पतीचे पेटीएमवर अकाउंट आहे. दरम्यान चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्यांना केवायसी पूर्ण करायचा असून त्यासाठी पेटीएमची माहिती देण्यास सांगितले. फिर्यादींनी माहिती दिल्यानंतर पेटीएम लिंक असणाऱ्या बँक खात्यावरून या भामट्यानी २ लाख २५ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास चतुःश्रुंगी पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com