‘कोरोना’च्या संकटादरम्यानच राज्यात निसर्ग संकट, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘लोकांनी घरातच थांबावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना साथीच्या आजाराचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रावर आता चक्रीवादळाचा धोका आहे. चक्रीवादळ मुंबई आणि पालघरजवळ पोहोचले आहे. हे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आदळणार असल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना दोन दिवस घरात राहण्याचे आवाहन केले आहे. पूर्वीच्या चक्रीवादळापेक्षा निसर्ग अधिक धोकादायक असेल असे ते म्हणाले. आम्ही प्रार्थना करीत आहोत की, येथे पोहोचण्यापूर्वी त्याचा प्रभाव कमी होईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लष्कराचे आणि एनडीआरएफच्या तीन टीम सतर्क आहेत.

मंगळवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत वादळाविषयी चर्चा झाली. केंद्राने मदतीचे आश्वासन दिले आहे.त्यानी सांगितले की, आम्ही उद्यापासून आपले ध्येय पुन्हा सुरू करणार आहोत, पण मी लोकांना 2 दिवस घरात राहण्याचे आवाहन करेन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जवळपास सर्व मच्छीमारांशी संपर्क साधला आहे. पालघरमधील काही लोकांशी लवकरच संपर्क साधला जाईल. पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंत सर्वांची काळजी घेण्याची व जास्त दक्षता घेण्याची गरज आहे. सीएम ठाकरे म्हणाले की, जर मुसळधार पाऊस आणि पूर आला तर आपल्याला काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करावा लागू शकतो. विद्युत उपकरणांचा अनावश्यक वापर टाळा. उद्धव ठाकरे म्हणाले की, दैनंदिन सर्व महत्वाच्या वस्तू लोकांनी एकाच ठिकाणी ठेवाव्यात. अफवा पसरवणे टाळा.

मुंबई व आसपासच्या जिल्ह्यात रेड अलर्ट
निसर्गाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफची 10 पथके संवेदनशील जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत, तर 6 इतरांना सतर्क ठेवण्यात आले आहे. किनाऱ्यावरील पालघर आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या रासायनिक आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like