दाभोलकर हत्या प्रकरण : श्रीकांत पांगारकरला चौकशीसाठी जालन्यात आणले

जालना : पोलीसनामा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील सुत्रधार असल्याच्या संशयावरून जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. एटीएसने पांगारकरला जालना तालुक्यातील रेवगाव येथील पाचनवडगाव शिवारात असलेल्या एका फार्म हाऊसवर चौकशीसाठी आणले होते. या फार्म हाऊसवर श्रीकांत पांगारकर व काही सनातनच्या कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे. चौकशीसाठी एटीएसचे ४० ते ५० जणांचे पथक आले होते.

[amazon_link asins=’9351772071,8172234988′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c36eca5a-a9b6-11e8-b92a-f553df5947d2′]

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाशी संबंधित धागेदोरे तपासासाठी मुंबई-औरंगाबाद व कर्नाटकातील दहशतवादी विरोधी पथक, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यात सध्या तळ ठोकून आहे.

औरंगाबाद येथील दौलताबाद तालुक्यातील केसापुरी गावात राहणाऱ्या शरद कळसकर आणि सातारा येथील शिवप्रतिष्ठानचा सुधन्वा गोंधळेकर या दोघांना एटीएसने मुंबई येथे अटक केली होती. तपासादरम्यान अटक करण्यात आलेला वैभव राऊत हा अटकेच्या दोन आठवड्यापूर्वी औरंगाबाद येथील कैलासनगर, बसय्येनगर भागात येऊन गेल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर एटीएसच्या पथकाचे राज्यभरात धाडसत्र सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक एटीएसची मदत घेत १४ ऑगस्ट रोजी शहरातील कुंवार फल्ली गल्लीत राहणाऱ्या सचिन अंदुरे व जालना येथे राहणाऱ्या श्रीकांत पांगरकर यांना ताब्यात घेतले होते. सचिन अंदुरे यांची कसून चौकशी केली असता त्याने व साथीदाराने दाभोळकरांवर गोळी झाडल्याचे समोर आले. त्यानंतर एटीएसने त्यास सीबीआयच्या ताब्यात दिले.