तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनला दिला ‘हा’ कठोर ‘संदेश’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंदुकीच्या ताकदीपेक्षा सत्याची ताकद अधिक मजबूत आहे असा इशारा तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनला दिला आहे. बोधगयामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमानंतर तुम्ही चीनला कोणता संदेश द्याल असे त्यांना विचारण्यात आले होते त्यावर उत्तर देताना त्यांनी चीनला हा इशारा दिला आहे. दलाई लामा हे ६ जानेवारीपर्यंत बोधगया येथे असणार आहेत.

तसेच यावेळी बोलताना लामा यांनी प्राचीन भारतावर देखील भाष्य केले, प्राचीन भारतीय ज्ञान खूपच उपयोगी आहे. अंहिसा आणि करुणा जगासह भारतानंही आत्मसात केली पाहिजे. आधुनिक भारतात हे ज्ञान पुर्नप्रस्थापित करण्याची गरज आहे. हे ज्ञान पुन्हा जागृत करणं ही मानवाची गरज बनली आहे. संपूर्ण जगानं अंहिसा आणि करूणेचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे भाष्य देखील लामा यांनी बोधगयामधील कार्यक्रमानंतर केले.

तसेच लामा यांना यावेळी चीन आणि त्यांच्या भूमिकेबाबत विचारले असता लामा म्हणाले, चीनमध्ये सर्वाधिक लोकसंख्या बौद्ध धर्मियांची आहे त्यामुळे चीन हा पारंपरिक दृष्ट्या बौद्धांचा देश आहे.चीनच्या विद्यापीठांमध्ये बौद्ध विद्वानांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमध्ये बौद्ध धर्मियांची संख्या वेगाने वाढत आहे. परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे. आमच्याकडे सत्याची ताकद आहे, तर चीन कम्युनिस्टांकडे बंदुकीची ताकद आहे, असं दलाई लामा यावेळी बोलताना म्हणाले.

बुधवारी दलाई लामा हे मुंबई वरून बोधगया येथे कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी लामा यांना भेटण्यासाठी त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/