Bigg Boss 13 : दलजीत कौरचा एकदम ‘BOLD’ व्हिडिओ व्हायरल, नव्या प्रेमाच्या शोधात आली बिग बॉसमध्ये !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कयामत की रातची चर्चित अ‍ॅक्ट्रेस दलजीत कौरने जेव्हापासून बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली आहे. तेव्हापासून ती चर्चेत आहे. आपल्या 6 वर्षाच्या मुलाला सोडून ती या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेणार आहे. त्यामुळे या शोमध्ये येताच ती भावूक झाली होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं.

रविवारी रात्री बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताना दलजीतने सांगितले की, तिने आपल्या मुलाला आपल्या आई वडिलांकडे सोडले आहे. नुकताच दलजीतचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. पिंक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दलजीत दिसत आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये दलजीत सेक्सी फोटोशुट करताना दिसत आहे.

दलजीतचा पती शालीन भनोटसोबत 2015 मध्ये घटस्फोट झाला होता. दलजीत आपल्या मुलासोबत आता एकटीच रहाते.

https://www.instagram.com/p/BuVsay9nlWm/?utm_source=ig_embed

36 वर्षीय दलजीत आजही खूप हॉट आणि फिट दिसते. शोमध्ये तिने ग्रीन अँड गोल्डन कलरचा ड्रेस घालून एन्ट्री केली होती. सलमान तिला म्हणाला होता की, “तुझ्या स्किनमुळे तुझ्या वयाचा अदाजच येत नाही.”

https://www.instagram.com/p/BpmCb4aHnRB/?utm_source=ig_embed

दलजीत प्रश्न विचारण्यात आला होता की, तुला असं वाटतं का की, तुझ्यासाठी इथे प्रेमाची नवीन सुरुवात होऊ शकते? या प्रश्नाला उत्तर देताना दलजीत म्हणाली की, जर तिला कोणी मॅच्युअर व्यक्ती मिळाली तर तिचा प्रेमाचा शोध पूर्ण होईल.

https://www.instagram.com/p/BoUApANHl5d/?utm_source=ig_embed

Visit : Policenama.com