‘या’ 8 गोष्टी एकत्र खाताय ? व्हा सावध, आरोग्यासाठी असू शकतं ‘विष’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   समोर जर लज्जतदार जेवण असेल तर बर्‍याच वेळा पोट भरलेले असूनही भूक लागते. प्लेटमध्ये जे काही ठेवले आहे ते अगदी एकाचवेळी खाऊन टाकावे, असे वाटते. मात्र अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा लोक एकत्रितपणे त्या वस्तूंचे सेवन करतात, ज्या एकत्र खाणे आरोग्यासाठी विष आहे. म्हणजेच अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण फक्त एकट्या खाल्ल्या पहिजे म्हणजेच त्यांच्याबरोबर इतर काहीही खाऊ नका, तर आरोग्यासाठी फायद्याचे आहेत, परंतु त्यांच्याबरोबर इतर गोष्टींचे संयोजन फायदेशीर नसून हानिकारक आहे. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी एकत्र टाळल्या पाहिजेत..

अन्नाबरोबर खाऊ नका फळं

आयुर्वेदानुसार जेवण करताना फळे खाऊ नये. दोन्ही गोष्टींंचे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनसह मॅक्यनिजम वेगळे असते. विशेषतः लिंबूवर्गीय फळे. ही फळे अम्लीय असतात. अशा परिस्थितीत जर ते कार्बोहायड्रेटसह खाल्ले तर पचन प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसार देखील होऊ शकतो.

बटाटे आणि भात

तुम्ही बर्‍याच जणांकडून ऐकलं असेल की त्यांना भाताबरोबर बटाट्याची भाजी खूप आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का? बटाटे बरोबर भात खाल्ल्याने बद्धकोष्ठता निर्माण होते. त्यामुळे जर तुम्हीही हे कॉम्बिनेशन खात असाल तर आजच सोडून द्या.

कोल्डड्रिंकनंतर पेपरमेन्टचे सेवन टाळा

कोल्ड ड्रिंक घेतल्यानंतर कधीही पेपरमिंट असलेल्या पान मसाल्याचे सेवन करू नका. कोल्डड्रिंक आणि पेपरमिंट एकत्र केल्यावर सायनाइड तयार होते जे आरोग्यासाठी विष म्हणून काम करते.

कांदा आणि दूध टाळा

कांदा आणि दूध एकत्र घेणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. दाद, खाज सुटणे, एक्जिमा यासारख्या.

दही आणि मासे अजिबात एकत्र खाऊ नका

दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. मासे गरम असतात तर दही थंड असते. त्यामुळे, या दोन्हींचे मिश्रण आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गॅस, अ‍ॅलर्जी आणि त्वचेसंबंधित अनेक आजार त्याच्या सेवनामुळे होऊ शकतात.

दुधासह लिंबाचा रस

लिंबाचा रस दुधासह कोणत्याही गोष्टीमध्ये खाऊ नये. यामुळे अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

दुधासह दही खाणे टाळा

चुकून दूध आणि दही एकत्र खाऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो.

नॉनवेजसह मिठाई

बरेच लोक नॉन-व्हेज खाल्ल्यानंतर मिठाई खातात. आपण देखील असे करत असल्यास काळजी घ्या. असे केल्यास आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. हे पोटावर सर्वाधिक परिणाम करते.