दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी आशा शितोळे तर उपसभापतीपदी नितीन दोरगे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड पंचायत समितीच्या सभापतीपदी आशा शितोळे तर उपसभापतीपदी नितीन दोरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान सभापती ताराबाई देवकाते, उपसभापती प्रकाश नवले यांचा ठरलेला कार्यकाल संपल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. निवडीचा हा कार्यक्रम दौंड पंचायत समिती येथे पार पडला.

विद्यमान सभापती ताराबाई देवकाते, उपसभापती प्रकाश नवले यांनी कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता. यानंतर आशा नितीन शितोळे यांनी सभापती पदासाठी तर नितीन शांताराम दोरगे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. सभापती, उपसभापती पदासाठी फक्त दोघांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे आणि बि.डी.ओ.गणेश मोरे यांनी सभापतीपदी आशा शितोळे तर उपसभापतीपदी नितीन दोरगे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासो पवार, वीरधवल जगदाळे, मधुकर दोरगे, सोहेल खान यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/