वनविभाच्या भोंगळ कारभारामुळे मृत मोर 24 तास पडून, पशु-पक्षी प्रेमीमध्ये मोठी नाराजी

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे एका विहिरीमध्ये पडलेल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू झालेला असताना वनविभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सुमारे २४ तासानंतर ही मोर तसाच पडून असल्याने वनविभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

गणेगाव खालसा ता. शिरूर येथील योगेश चातुर या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये एक सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एक नर जातीचा मोर , असल्याचे आढळून आले होते, याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र गणेश टिळेकर, महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संरक्षण संस्थेचे सदस्य शेरखान शेख, श्रीकांत भाडळे, अतुल थोरवे यांनी त्या ठिकाणी धाव घेत तेथील मंगेश चातुर, सचिन वर्पे, अनिकेत फंड यांच्या मदतीने पाण्यात पडलेल्या मोराला मोठ्या शिताफीने पाण्याबाहेर काढले परंतु काही वेळातच मोराचा मृत्यू झाला, त्यानंतर वनविभागाचे शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना माहिती देण्यात आली, त्यांनतर प्राणीमित्रांनी त्या मोराला सुरक्षित ठेवले, पुन्हा एकदा दोन सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संरक्षण संस्थेचे सदस्य ,तसेच सर्पमित्र यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना आमचा माणूस येऊन मोराला ताब्यात घेऊन जाईल असे सांगितले.

मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत वनविभागाचा कोणी कर्मचारी भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराकडे फिरकला नाही, त्यामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे, याबाबतीत सर्पमित्र,महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संरक्षण संस्थेचे सदस्य,पक्षी प्रेमी यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे, याबाबत सायंकाळी उशिरा “पोलीसनामा” ने वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही आत्ता तिकडे गाडी पाठवली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.