Corona Virus : ‘वटवाघूळ’ किंवा ‘सापा’मुळे नव्हे, तर ‘खवल्या मांजरा’मुळे फोफावला ‘कोरोना’ व्हायरस

बिजिंग : वृत्तसंस्था- एका नव्या प्रयोगातून समजले आहे की, कोरोना व्हायरस मुनष्यात येण्यास वन्यप्राणी खवले मांजर (पँगोलिन) ची भूमिका असू शकते. आतापर्यंत असा अंदाज लावण्यात येत होता की, वटवाघुळ आणि साप यांच्याकडून कोरोनाचा व्हायरस पसरला आहे. संशोधन करणार्‍या दक्षिण चीन कृषी विद्यापीठने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, कोरोनाचा जीन्स पँगोलिनच्या जीन्सशी 99 टक्के जुळतो.

चीनची अधिकृत न्यूज एजन्सी शिन्हुआचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, या शोधानुसार पँगोलिनपासून माणसांमध्ये हा आजार येण्याची मोठी शक्यता आहे. पँगोलिन हा खवले असणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. आशियाच्या अनेक देशात याचा खाण्यासाठी आणि औषधासाठी वापर केला जातो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार जागतिक बाजारात याची किंमत दहा ते बारा लाख रुपये आहे. तर भारतात हे तस्करीद्वारे 20 ते 30 हजार रुपयात विकले जाते.