‘टायटॅनिक’ जहाज बुडल्यानंतर 107 वर्षांनी अमेरिका – इंग्लड दरम्यान झाला ‘हा’ करार

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन – टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्या समुद्र सफारीला जात असताना हिमकड्याला धडकून त्याला जलसमाधी मिळाली होती. टायटॅनिक जहाज बुडल्यानंतर तब्बल 107 वर्षानंतर आता अमेरिका आणि इंग्लड यांच्यात एक करार झाला आहे. या आंतरराष्ट्रीय करारामुळे दोन्ही देशातील सरकारांना लायसन्स जारी करणे अथवा ते रद्द करण्याचा अधिकार मिळाला आहे. या जहाजावर कोणाला प्रवेश द्यायचा अथवा तेथील कोणत्या कलात्मक वस्तू हटवायचा हे ठरविता येणार आहे.

जगविख्यात टायटॅनिक जहाजाचे अवशेष सुरक्षित राखण्यासाठी हा करार महत्वपूर्ण समजला जात आहे.
टायटॅनिक जहाज 107 वर्षापूर्वी 1912 मध्ये उत्तर अटलांटिक महासागरात एका प्रचंड हिमखंडाला टक्कर दिल्याने दुर्घटनाग्रस्त झाले व त्यातून त्याला जलसमाधी मिळाली होती. या जहाजावरील दीड हजार प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांची यादी संरक्षित करण्यात येणार आहे. या जहाजाच्या अवशेषांबाबत 1985 मध्ये माहिती मिळाली होती. उत्तर अटलांटिक महासागरात जेथे हे जहाज बुडाले. तो भाग आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात येतो. त्यामुळे हे अवशेष जतन करणे, त्यावर लक्ष ठेवणे अशा गोष्टी करणे शक्य नव्हते. आता हा करार झाल्याने ते शक्य होणार आहे.

बेलफास्टच्या हार्लेन्ड अँड वोल्फ कंपनीकडून हे जहाज बनविण्यात आले होते. टायटॅनिकची पहिली यात्रा साऊथहम्प्टन ते न्यूयॉर्क दरम्यान होती. ही यात्रा सुरु असताना 15 एप्रिल 1992 रोजी हे जहाज बुडाले होते.

फेसबुक पेज लाईक करा –