स्वाईन फ्लूने येळावीतील महिलेचा मृत्यू

तासगाव :  पोलीसनामा ऑनलाईन

तासगाव तालुक्यात स्वाईन फ्लूची साथ सुरु असून  येळावी येथील चंदाराणी सुखदेव गडदे ( वय 32) यांचा सोमवारी सांगलीतील  खासगी दाखान्यात स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ तानाजी बिरू शेंडगे (वय 35) यांच्यावरही सांगलीतील शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूवर उपचार सुरू आहेत. वासुंबे येथील तानाजी सीताराम पाटील ( वय 54) यांच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे स्वाईन फ्ल्यू नियंत्रणात आणण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2506bcb5-b5d5-11e8-8a67-7b6cedc76e6f’]

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले, की  येळावी चंदाराणी गडदे यांना  श्‍वसनाचा त्रास होत होता.  त्यांना 6 सप्टेंबर  रोजी सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची स्वाईन फ्ल्यू तपासणी केली असता ती पॉझिटीव्ह आली. स्वाईन फ्ल्यूचे उपचार त्यांच्या सुरु असताना उपचारादरम्यान त्यांचा  मृत्यू झाला.

शाळकरी मुलींच्या सरंक्षणासाठी आजपासून रक्षा अभियान

दरम्यान, त्यांना  दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे भाऊ तानाजी शेंडगे यांनाही  श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ते सुध्दा स्वाईन फ्लू सदृष्य आजाराने त्रस्त आहेत. खासगी इस्पितळात उपचार सुरू असलेल्या वासुंबे येथील  तानाजी पाटील यांचीही   स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, असे  डॉ.  सूर्यवंशी यांनी सांगितले.