धक्कादायक ! पैजेच्या नादात जीवाभावाची ‘मैत्री’ कायमची ‘तुटली’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोहण्याची पैज लावून सरोवरात उतरलेल्या पाच मित्रांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. ही घटना म्हसरूळ हद्दीतील प्राचीन सीता सरोवरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हेमंत श्रीधर गांगुर्डे (वय-33 रा. म्हसरुळ) आणि हर्षल उर्फ विकी राजेंद्र साळुखे (वय-34 रा. ओमकार नगर, म्हरुळ) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच तरुण रात्री साडे अकराच्या सुमारास सरोवरात उतरले होते. मृत हेमंत आणि विकी यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विकी हा मायको कंपनीत कामाला होता. मात्र त्याला ब्रेक मिळाल्याने त्याने काही महिन्यांपूर्वी एक हॉटेल चालवायला घेतले होते. तर हेमंत हा इलेक्ट्रिकची कामे करत होता.

दरम्यान, या घटनेबाबात परिसरात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. पाच मित्र रात्री साडे अकराच्या सुमारास सरोवराजवळ गेले होते. त्यांच्यामध्ये पोहण्याची पैज लागली होती. एकाने उडी मारल्यानंतर चौघांनी देखील सरोवराच्या पाण्यात उड्या मारल्या. मात्र, चौघांनाही पोहता येत नव्हते. त्यातील दोघेजण बाहेर आले. मात्र हेमंत आणि विकी बाहेर आले नाहीत. एकाने हेमंतला बाहेर काढले. तर विकीचा शोध न लागल्याने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशीरा त्याचा पाण्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला.

You might also like