‘या तीन जागांचा तोडगा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काढू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या संघटना एकत्र आल्या आहेत. ४५ ते ४६ जागांवरती एकमत झालं आहे. तरी दोन तिन जागांवर तिढा कायम आहे. आचार संहिता लागायच्या आधी यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना दिली. शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना ही माहिती दिली.

आघाडीच्या ४५ ते ४६ जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांचा तिढा आहे. नगर, रावेर आणि औरंगाबाद च्या जागांवर निर्णय बाकी आहे. मात्र, तीन दिवसात या जागांवर निर्णय होईल, असं त्यांनी म्हटलं. तसंच गेल्या निवडणुकीत भाजप सोशल मीडियामुळे सत्तेत आला होता. त्यामुळे सोशल मीडिया हे महत्त्वाचे तंत्र आहे. आपण यापूर्वी त्यात लक्ष घातले नव्हते, मात्र आता पूर्ण लक्ष घातले आहे, असं त्यांनी यावेळी म्हटले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचं धोरण सरकारने जाहीर केले. मात्र, ते आता न्यायालयात रखडले आहे. राज्याचे महाधिवक्ता आरक्षण मिळू नये म्हणून ते कसे घटनाबाह्य आहे, हे पोटतिडकीने सांगत आहेत., असं मराठा आरक्षणावर त्यांनी म्हटलं. तसंच धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा बारामती मध्ये केली. मात्र आजपर्यंत काही केलं नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, देशवासियांची समस्यांतून सुटका करायची असेल परिवर्तन केले पाहिजे. राज्यात परिवर्तन झाल्यानंतर आपले काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार येईल. तेव्हा कर्जमाफीच्या नियमात अमूलाग्र बदल करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

३० हजार रुपयाची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुलाच्या मृत्यूच्या धक्याने वडिलांचाही मृत्यू

उंदराने टाकला हायप्रोफाइल दरोडा, लाखोंचे हिरे लंपास !

RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘ही’ असणार नाण्याची खासियत

४ हजार रुपयाची लाच घेताना महिला पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात