Deepak Kesarkar | तुम्ही लोकांना खोटे सांगत फिरता, आता आम्हालाही…, दीपक केसरकर यांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोरेगावच्या सभेत शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपावर (BJP) केलेल्या टीकेमुळे घायाळ झालेल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना चारही बाजूने घरले असतानाच पुन्हा एकदा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल तळेगाव येथे जनआक्रोश आंदोलनात वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) व इतर विषयावरून शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) वाभाडे काढले. यावर आता भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ताबडतोब शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करत आहात. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही येत नव्हता. आज सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघर फिरायला लागले आहात.

उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड करताना केसरकर म्हणाले, शिवसैनिकांना (Shiv Sainik) साधी तुमची भेट मिळत नव्हती. आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार वर्षाच्या समोर रस्त्यावर उभे राहात होते. ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रावर आणली होती. आता तुम्ही लोकांना खोटे सांगत फिरता. त्यामुळे आता आम्हालाही खरे सांगत महाराष्ट्रभर फिरावे लागेल. पण आम्ही आमची कामे सांभाळून ते लोकांना सांगू. कामे ठेवून आम्ही आमच्या यात्रा काढणार नाही. माझी यात्रा असताना मी शाळांना भेटी दिल्या. आमच्या विभागाच्या बैठका घेतल्या आहेत. एवढे काम आम्ही दिवसरात्र करतो. (Deepak Kesarkar)

 

तळेगावच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार आरोप केले होते.
आदित्य म्हणाले, महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसर्‍या राज्यात गेला.
वेदांता-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाईस पार्क (Medicine Device Park) हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे.
या खोके सरकारचे लक्ष त्यांच्या गटात कोण येत आहे, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत,
गुंतवणूक कोण घेऊन येत आहे याकडे कुणाचेच लक्ष नाही.

 

Web Title :- Deepak Kesarkar | cm eknath shinde group mla deepak kesarkar slams aaditya thackeray and shivsena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या पालकमंत्री पदाची मिळाली जबाबदारी

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा