15 व्या वर्षीच ‘रामायण’ मधील ‘सीता’ बनली होती दीपिका चिखलिया, सांगितली पहिल्या एपिसोडची कहाणी !

पोलिसनामा ऑनलाइन –रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतील अनेक किस्से सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अशात एक नवीन किस्सा समोर आला आहे जो खुद्द सीतेनच म्हणजेच दीपिका चिखलियानं शेअर केला आहे.

दीपिकानं एका मुलाखतीत अनेक किस्से शेअर केले आहेत. या मालिकेचा पहिला एपिसोड कसा शुट झाला होता याबाबतही तिनं सांगितलं आहे. दीपिका म्हणाली, “जेव्हा मी या मालिकेत काम करायला सुरुवात केली तेव्हा मी अवघ्या साडे पंधरा वर्षींची होते. तेव्हा या गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती की, आम्ही एक नवीन इतिहास रचणार आहोत.”

पुढे बोलाताना दीपिका म्हणाली, “आम्हाला एकदम तसंच तयार करण्यात आलं होतं जरसं रामचरित मानस तुलसीदासनं राम आणि सीतेचं वर्णन केलं होतं. ही पहिलीच वेळ होती जेव्हा टीव्हीवर रामायण दाखवलं जाणार होतं. त्या काळात टीव्ही सीरिजला एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती.”

पहिल्या एपिसोडबद्दल सांगताना दीपिका म्हणाली, “रामायणचा पहिला एपिसोड एक तासाचा होता. ज्याला शुट करण्यासाठी 15 दिवस लागले होते. जिथं शटींग व्हायची तिथंच सगळे थांबत असे. तिथचं मेकअप स्टुडिओ होता. कोणीच मुंबईला परत येत नव्हतं.” दीपिकानं असंही सांगितलं की, 6 महिन्यातच रामायणमधील सर्व अॅक्टरला स्टार्स झाल्याची जाणीव झाली होती.