दीपिका पादुकोणने सलमान खानला विचारला प्रश्न, तुला बाळ कधी होईल ? यावर त्याने दिले मजेदार उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसमध्ये नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दीपिका पादुकोण आणि विक्रांत मैसी यांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ चित्रपटाचे प्रमोशन केले. बिग बॉसमध्ये रिअल अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल देखील सहभागी झाली होती. बिग बॉसच्या सेटवर सलमान खान आणि दीपिका पादुकोणने खूप मस्ती केली. त्याच दरम्यान दीपिका पादुकोणने सलमानला एक मजेदार प्रश्न विचारला की, तुला बाळ कधी होईल ?

लक्ष्मी अग्रवाल हीच्याशी बोलताना सलमान खानने दीपिकाला छेडले आणि म्हणाला, मी गॅरंटी देतो की एका लक्ष्मीने दीपिकाला स्वतः घरात आणले तर दुसरी लक्ष्मी दीपिकाच्या घरी जाईल. एवढी छपाकपासून आम्हाला आशा आहे की, एक आयत, आहिल किंवा सलमान येईलच. सलमानचे उत्तर ऐकून दीपिका म्हणाली की, तु पहिले लग्न कर सलमान.

https://www.instagram.com/p/B6xizjeD3Kc/

त्याला उत्तर म्हणून सलमान म्हणाला की, लग्नाशी काही घेणं-देणं नाही मॅडम. मग दीपिका म्हणाली, मग तु लग्न नको करु, आधी तुझं मुलं जन्माला घाल पहिले. यावर सलमान खानने एक मजेदार उत्तर दिले आणि म्हणाला की, पहिले मी तरुण झालो पाहिजे आणि त्यानंतर मी मुलांना पाहिल. माझ्या खेळण्याच्या दिवस गेले.

बिग बॉसबद्दल बोलायचे म्हणले तर, दीपिका-विक्रांत आणि लक्ष्मी घराच्या आत जात असताना कुटुंबातील सदस्यांसह गेम खेळले होते. एका टास्कमध्ये, स्पर्धकांना एकमेकांची नकल करुन एपिक सीन्सला रिक्रिएट करायचे होते. या टास्कला जिंकणाऱ्या टीमला एक मोठे गिफ्ट मिळाले होते. ते सर्व काहीवेळ दीपिकासोबत घराबाहेर फिरायला गेले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/