‘बेबी प्लॅनिंग’बाबत अभिनेत्री दीपिकाचा खुलासा, म्हणाली-‘मी आणि रणवीर लवकरच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोणने जेव्हापासून लग्न केलं आहे. तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा समोर येताना दिसत आहेत. दीपिकाने बेबी प्लॅनिंगला घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे. दीपिका म्हणाली, “मला आणि रणवीरला आई बाबा होण्याची इच्छा आहे. आम्हाला बाळं खूप आवडतात. त्यामुळे कोणत्या प्लॅनिंगशिवाय आम्हाला आई बाब व्हायचं नाही.”

https://www.instagram.com/p/B3bW6msDnLx/

पुढे दीपिका म्हणाली, “मी आणि रणवीर दोघंही आपल्या करिअरवर फोकस करत आहोत. माझं कोणतंही बेबी प्लॅनिंग नाही.” गेल्या ऑगस्ट महिन्यात दीपिका आणि रणवीर लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होते तेव्हा दीपिका प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. या सर्व चर्चांना दीपिकाने पूर्णविराम दिला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका आणि रणवीर इटलीतील लेक कॅमिओमध्ये विवाहबद्ध झाले होते.

https://www.instagram.com/p/B0c-vOKjom9/

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच दोघेही 83 सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. लग्नानंतर हा त्यांचा पहिलाच एकत्र सिनेमा असणार आहे.

https://www.instagram.com/p/BzF7KafASZG/

https://www.instagram.com/p/BzFMrP3A5cP/

https://www.instagram.com/p/Bxh15jfgmvo/

https://www.instagram.com/p/BxK85hRgymx/

https://www.instagram.com/p/BwoqH6xgK45/

https://www.instagram.com/p/BuLtsAEAaXF/

visit : policenama.com