सैनिकी शाळांमध्ये आता मिळणार मुलींना प्रवेश, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सैनिकी शाळांमध्ये मुलींच्या भरतीबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैनिक शाळांमध्ये मुलींच्या भरतीला परवानगी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी मिझोराम येथे सुरु केलेल्या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सरंक्षण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीनुसार 2021-2022 या शैक्षणिक वर्षात सैनिकी शाळांमध्ये मुलींची भरती सुरु होणार आहे. यासाठी राजनाथ सिह यांनी शाळांमध्ये महिला कर्मचारी आणि त्यासाठी लागणारी पूर्ण व्यवस्था करण्याचे आदेश दिलेले आहेत. सरंक्षण मंत्रालयाने लष्करात महिलांना समान वाटा, लैंगिक समानता आणि मोदी सरकारने सुरु केलेले ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी