राहुल गांधींची जीभ पुन्हा एकदा ‘घसरली’, PM मोदींवर एकदम ‘वादग्रस्त’ टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणुका आल्या की घोषणाबाजी आणि वादग्रस्त विधानांची मोठी चर्चा असते. त्यातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल अक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधी म्हणाले, ‘हे जे नरेंद्र मोदी भाषण देत आहेत ते 6 महिन्यानंतर घराबाहेर पडू शकणार नाहीत, भारताचा तरुण त्यांना अशा काठीने मारहाण करेल, तेव्हा त्यांना समजेल की तरूणांना रोजगार दिल्या शिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. हौज राणी येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

गुंतवणूकदार मागे जात आहेत :

गुंतवणूकीदारांबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, चीन मध्ये संतुलन असावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. व्यापाऱ्यांनी आपले पैसे चीन मध्ये ठेवले आणि तेथे कोरोना व्हायरस आल्याने तेथील कारखाने बंद झाले. संपूर्ण जग म्हणत आहे की, आम्हाला भारतात पैसे गुंतवायचे आहेत. मात्र भारतातील वाढता हिंसाचार आणि द्वेशामुळे गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यास तयार नाहीत.

मोदीजी आपला संपूर्ण वेळ हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चनामध्ये फूट पाडण्यात घालवत आहेत. सकाळी उठताच त्यांना हा प्रश्न पडतो कि देशाचं विभाजन कसं करता येईल? ते आसाम, महाराष्ट्र, पंजाबमध्ये सर्व ठिकाणी लढा देत असतात आणि स्वतः खूप मोठा देशभक्त असल्याचा दावा करतात, असेही राहुल गांधी म्हणाले.