दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा, आजपासून आचार संहिता लागू, 11 फेब्रुवारीला निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल आरोरा यांनी आज जाहीर केल्या. दिल्लीत 8 फेब्रुवारी रोजी निवडणूका पार पडणार असून 11 फेब्रुवारीला निडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. आजपासून दिल्लीत आचार संहिता लागू झाली आहे.

दिल्लीत आता निवडणूकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. आप, भाजप, काँग्रेस सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु झाला आहे आणि आता निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रचाराच्या तोफा डागल्या जाणार आहेत.

दिल्लीत विधानसभा निवडणूकासाठी एकूण 13,750 मतदान केंद्र असणार आहेत. तसेच दिल्लीत मतदारांची एकूण संख्या 1 कोटी 46 लाख आहे.

सध्या दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचे सरकार आहे. हे सरकार कायम राहणार की सत्ताबदल होणार हे निकालाअंतीच स्पष्ट होईल. परंतु देशातील वातावरण पाहता दिल्लीतील निवडणूकांसाठी निवडणूक आयोगाकडून देखील सुरक्षेची मोठी तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून नये याची काळजी निवडणूक आयोगाकडून घेण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/