दिल्‍लीत महिला क्राईम रिपोर्टरवर बेछुट गोळीबार

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – देशाची राजनाधी दिल्‍लीमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये अलिकडील काळात वाढ झाली आहे. क्राईम रिपार्टर असलेल्या मिताली चंदोला यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजता मयूर विहार परिसरातील धर्मशीला कॅन्सर हॉस्पीटलजवळील सिग्‍नल जवळ घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मिताली यांना धर्मशीला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मिताली यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. हल्‍लेखोरांनी मिताली यांच्या वाहनाच्या समोरील काचांवर गोळीबार केला तर चालक आणि साईड ग्लासवर अंडे फेकुन मारले. ही घटना वैयक्‍तिक पुर्ववैमनस्यातून घडल्याचा पोसिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिताली यांच्यावर अन्य कोणत्या कारणावरून गोळीबार झाला काय याचा तपास दिल्‍ली पोलिस करीत आहेत. दरम्यान काही दिवसांपुर्वीच दक्षिण दिल्‍लीतील बारापुला फ्लायओवर जवळ एका टीव्ही चॅनलमध्ये काम करणार्‍यावर रात्रपाळी करून घरी जात असताना चोरीच्या उद्देशाने गोळीबार झाला होता.

सिने जगत –

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीने घेतले ‘ते’ इंजेक्शन ; व्हिडीओ सोशलवर ‘चालतो’ नव्हे ‘पळतो’

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like