‘गोडी – गुलाबी’ नं पत्नीला नेलं ‘लाँग’ ड्राईव्हवर, नंतर ‘गोळया’ घालून मृतदेह फेकला रस्त्यावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप करून तिची हत्या केली. त्याने हत्या करण्याआधी कुणाला काहीही खबर होणार नाही या पद्धतीने चतुराईने नियोजनपूर्वक योजना आखली होती. दिल्लीच्या जनकपुरी भागातील २० वर्षीय विवाहित महिला १० नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतीचे तिच्याशी बर्‍याचदा भांडण तंटे व्हायचे, त्यामुळे तो वैतागला होता. यानंतर त्याने आपल्या दोन मित्रांसह पत्नीला ठार मारण्याची धक्कादायक योजना आखली. या योजनेनुसार त्याने प्रथम पत्नीला लाँग ड्राईव्हसाठी पानिपत येथे नेले आणि त्यानंतर तेथेच तिला गोळी घालून ठार केले. या हत्येप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये त्यांनी लग्न केले. २० वर्षीय नॅन्सी शर्मा २१ वर्षीय साहिल चोप्रा शी २१ मार्च रोजी विवाहबद्ध झाली होती. पण लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये भांडण सुरू झाले. नॅन्सीच्या रोज रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पार्टीमुळे साहिल खूपच अस्वस्थ झाला होता आणि त्याने विवाहेतर संबंधांबद्दल शंका घ्यायला सुरुवात केली.

यामुळे त्यांच्या नात्यात बराच तणाव निर्माण झाला होता. पोलीसांच्या म्हणण्यानुसार साहिलने आपल्या पत्नीला घटस्फोटाची मागणीही केली होती पण लग्नाचे एक वर्ष पूर्ण केल्याशिवाय घटस्फोट घेऊ शकत नाही हे त्यांना कळले. नॅन्सीने घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर त्याला धमकीही दिली होती.

म्हणूनच साहिलने नॅन्सीला मारण्याची धोकादायक योजना आखली. ९ नोव्हेंबरच्या रात्री दोघांमध्ये बरेच भांडण झाले. यास वैतागून साहिलने एक योजना आखली आणि ती योजना अमलात आणण्यासाठी चोप्राने आपला चुलत भाऊ शुभम आणि ड्रायव्हर बादल यांना बोलावले, ज्यांनी मिळून बेकायदेशीर पिस्तूल व काडतूसची व्यवस्था केली आणि त्यानंतर १० नोव्हेंबरला सकाळी नऊच्या सुमारास साहिलच्या घरी पोहोचले. चोप्राने त्याच्या या योजनेचा एक भाग म्हणून नॅन्सीची माफी मागितली आणि तिची मनस्थिती सुधारण्यासाठी तिला आपल्याबरोबर लॉंग ड्राईव्हला येण्यास सांगितले. त्यानंतर ते दोघे आपल्या शेवरलेट वाहनावरून हरियाणाच्या पानिपतकडे लॉंग ड्राईव्हसाठी रवाना झाले.

दुपारपर्यंत ते पानिपत रिफायनरी जवळ आले. येथे नॅन्सी साहिलला सांगते की तिला थोडा वेळ आराम करायचा आहे. त्यानंतर साहिलने पब्लिक टॉयलेटच्या समोर गाडी थांबवली आणि त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मारण्यासाठी एकांतात असलेली जागा शोधली. जेव्हा नॅन्सी पुढे सरकली तेव्हा साहिलने जवळ जाऊन तिला मागच्या बाजूला डोक्यात गोळी घातली. तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याचे दोन्ही साथीदार आले आणि त्यांनी तिचा मृतदेह झाडीत फेकला.

इकडे नॅन्सीच्या वडिलांनी तिला बर्‍याच वेळा फोन केला पण काहीच उत्तर न आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. अशा परिस्थितीत साहिलने त्यांची दिशाभूल करण्यासाठी सांगितले की तिने आपल्या मित्राबरोबर पळ काढला असावा. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा पोलीसांनी नॅन्सीच्या मोबाइलचे लोकेशन चेक केले असता या प्रकरणापर्यंत पोहोचता आले.

साहिलच्या सांगण्यावरून पोलिसांनी पानिपत रिफायनरी (हरियाणा) जवळ रस्त्याच्या कडेला असलेला नॅन्सीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅन्सी यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी दिल्लीच्या द्वारका कोर्टात हजर केले. कोर्टाने तिघांना दोन दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठविले आहे.

Visit : Policenama.com