केजरीवालांचं भाजपला ‘ओपन’ चॅलेंज, निवडणुकांपुर्वी कोणत्याही राज्यात ‘फ्री’मध्ये ‘वीज – पाणी’ द्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच भाजप आणि आम आदमी पक्षात रोज नवीन वाद होताना दिसून येत आहेत. बुधवारी दोनीही पक्षांमध्ये जनतेला सुविधा आणि सबसिडी देण्यावरून चांगलीच जुंपली. मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्या मध्ये ते म्हणतात, जर दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आले तर आम्ही आप पेक्षाही पाच टक्के अधिक सबसिडी देऊ.

यावरून आप चांगलीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिवारी यांना खडे बोल सुनावत म्हंटले की आधी ज्या राज्यमध्ये भाजपचे शासन आहे त्या राज्यांमध्ये सबसिडी देऊन दाखवा.

केजरीवालांनी उपस्थित केले प्रश्न
भाजप 200 युनिटऐवजी 1000 यूनिट वीज फ्री मध्ये देणार का ?
20000 लीटर ऐवजी 100000 लीटर पानी फ्री देणार का ?

तसेच याबाबत केजरीवाल सोशल मीडियावर लिहितात असे आश्वासन देऊन तुम्ही जनतेची मस्करी करत आहात.त्यामुळे दिल्ली निवडणुकांच्या आधी कोणत्याही राज्यात तुम्ही हे राबवून दाखवा असे आव्हान केजरीवालांनी दिले.

मनोज तिवारी यांचा पलटवार
तुम्ही पाच वर्षात जे काही दिले त्याच्या पाच पट अधिक भाजप सरकार सत्तेवर आल्यावर नक्की देईल असा पलटवार मनोज तिवारी यांनी केला आहे. तर तुम्ही पाच वर्षात प्रति कुटुंब किती फायदा जनतेला दिला एवढे सांगा असे तिवारी यावेळी म्हणाले. दिल्लीला 8 फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे तर 11 फेब्रुवारी रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपला अनेक राज्यांची सत्ता गमवावी लागली होती त्यामुळे आता ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/