दिल्लीच्या लोधी इस्टेटमध्ये फायरिंग, CRPF च्या सब-इन्स्पेक्टरने सीनियरला मारली गोळी, नंतर केली ‘सुसाईड’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशाच्या राजधानीतील पॉश परिसरात लोधी इस्टेटमध्ये फायरिंग झाली आहे. ही घटना एका घरात घडली. घटनास्थळी अनेक वरिष्ठ अधिकारी पोहचले होते. लोधी इस्टेट एरिया नवी दिल्ली संसदीय क्षेत्रात येते. येथे मोठे राजकीय नेते आणि उद्योगपतींची घरे आहेत. या पॉश परिसरात गोळीबाराच्या आवाजाने खळबळ उडाली होती.

ताज्या माहितीनुसार, या खळबळजनक गोळीबारात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. सांगितले जात आहे की, सीआरपीएफ सब-इन्स्पेक्टरने प्रथम एका सीआरपीएफ इन्स्पेक्टरला गोळी मारली आणि त्यानंतर स्वत: गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. या गोळीबारात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. सध्या घटनेचे कारण समोर आलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.

माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशीरा 61 लोधी इस्टेटमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या भागात मोठ्या संख्येने खासदार आणि व्हीआयपी लोक राहतात. यामुळे गोळीबाराचे वृत्त समजताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तातडीने पोहचले.

पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असता सीआरपीएफचे 2 जवान गोळी लागण्याने जखमी झाल्याचे आढळले. परंतु, थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. तपासात समजले की, सब इन्स्पेक्टर करनल सिंह आणि इन्स्पेक्टर दशरथ सिंह यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता, जो इतका वाढला की, सब इन्स्पेक्टरने प्रथम इन्स्पेक्टरला गोळी मारली आणि नंतर स्वत:वर गोळी मारून घेतली. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.