Coronavirus : ‘जामा मस्जिद’च्या शाही इमाम बुखारी यांच्या PRO चा ‘कोरोना’मुळं ‘मृत्यू’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   दिल्लीतील जामा मस्जिदच्या शाही इमाम अहमद बुखारी यांच्या पीआरओचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. काल रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री उशीरा बुखारीचे पीआरओ अमानतुल्लाह कोरोनासोबतची लढाई हरले. गेल्या आठवड्यात त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळली होती, त्यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विशेष म्हणजे जामा मशिदीशी संबंधित कर्मचार्‍याचा मृत्यू हा चिंतेचा विषय आहे कारण सरकारच्या आदेशानंतर जामा मशिदही 8 जूनपासून उघडली गेली आहे, जिथे लोक नमाज पठण करीत आहेत. अशा परिस्थितीत जिथे संपूर्ण दिल्ली कोरोना विषाणूच्या गंभीर अवस्थेत पोहोचली आहे, तेथे दिल्लीच्या सर्वात मोठ्या धार्मिक स्थळाशी संबंधित कोरोनाचे हे प्रकरण अत्यंत चिंताजनक आहे.

image.png

इमाम बुखारी देखील परिस्थितीवर सक्रीय आहेत, त्यांनी स्वत: लोकांना आवाहन केले व कोरोना संक्रमणाचा धोका कमी होऊ शकेल यासाठी मशिदीला काही काळ बंद ठेवण्यात यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना लॉकडाऊनचा पाचवा टप्पा चालू आहे, परंतु यावेळी सर्व प्रकारच्या सवलती देखील देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनेही धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली, त्यानंतर दिल्ली सरकारने सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली. 8 जूनपासून दिल्लीची सर्व मंदिरे आणि मशिदी पूजा आणि नमाजसाठी उघडण्यात आल्या आहेत, परंतु त्यादरम्यान दिल्लीमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे.