आर्य समाजाचे नेते स्वामी अग्नीवेश यांचं झालं निधन, लिव्हर सिरॉसिसच्या आजारानं होते ग्रस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लिव्हर सिरॉसिस आजारामुळे आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे आज (शुक्रवार) दिल्लीत निधन झाले. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी स्वामींना आएलबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

काल (गुरुवार) रुग्णालय व्यवस्थापनाने माहिती दिली होती की, त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावली. एक-एक अवयव निकामी होत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. स्वीमी अग्निवेश यांची प्रकृति बिघडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर निरनिराळ्या विभागातील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर बारीक लक्ष ठेऊन होते. स्वामी अग्निवेश हे मागील काही दिवसांपासून यकृताच्या समस्येने आजारी होते. त्यांना यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. स्वामी अग्निवेश हे आर्य समाजाचे नेता, सामाजीक कार्यकर्ते, समाजसुधारक आणि राजकारणी होते.