दिल्ली : ‘निर्भया’च्या आईला निवडणूक ‘रिंगणात’ खेचण्यासाठी ‘चढाओढ’, तिकीट देण्यासाठी ‘स्पर्धा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहचवणार्‍या तिच्या आईला निवडणूक रिंगणात खेचण्याच्या तयारीत आहेत. सर्व पक्षांना अंदाज आहे की, निर्भयाची आई निवडणुकीत विजयी उमेदवार होऊ सिद्ध होऊ शकते. यासाठी राजकीय पक्ष ही संधी साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी यावर मत व्यक्त करताना सांगितले की, जी महिला आपल्या मुलीसाठी न्यायाची लढाई जिद्दीने लढू शकते, तिच्यापेक्षा संघर्ष करणार्‍या महिलेचे दुसरे उदाहरण कोणतेही असू शकत नाही.

राजकीय पक्षांचे म्हणणे आहे की, जर निर्भयाच्या आईने निवडणूक लढविण्यास होकार दिला तर ती विजयी उमेदवार होऊ शकते, शिवाय अन्य जगांवरही त्याचा चांगला प्रभाव पडून जास्त जागा निवडून येऊ शकतात. सर्वांचे लक्ष आम आदमी, वीज, पाणी आणि मोफत मेट्रोवर भर आहे.

माझा एकच हेतू, दोषींना फाशी : निर्भयाची आई
निवडणूक लढविण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत निर्भयाची आई म्हणाली, काहीही चर्चा सुरू नाही. आमचा फक्त एकच हेतू आहे तो म्हणजे दोषींना फासावर लटकलेले पहायचे. यावेळी आमच्या मनात दुसरी कोणतीही गोष्ट येऊ शकत नाही. यानंतर जर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढण्याबाबत प्रस्ताव आल्यास काय करायचे ते बघू.

आप, काँग्रेस आणि भाजपा करत आहे जाहीरनाम्याची तयारी

आम आदमी पार्टी
जनसंवादाच्या माध्यमातून आलेल्या सूचना आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून आम आदमी पार्टी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा तयार करत आहे. पार्टीच्या सूत्रांनी सांगितले की, जाहीरनाम्यात प्रामुख्याने 10 मुद्द्यांवर जोर देण्यात आला आहे. पिछले काम रहेंगे जारी, नये काम की है तैयारी, या व्हिजनसह जाहीरनामा तयार केला जात आहे. केजरीवाल यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे की, मोफत वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, तिर्थयात्रा आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, पुढील पाच वर्षातही मिळणार आहे.

काँग्रेस पक्ष
निवडणुकीत युवकांना आकर्षित करण्यावर काँग्रेसने जोर दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो सुविधा देण्याचा विचार करत आहे. आतापर्यंत काँग्रेसने अशा अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये 600 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणाही केली आहे. छोट्या इंडस्ट्रीजलाही 200 यूनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यातील काँग्रेस दिल्लीत सर्व वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांचा मासिक सहाय्य निधी वाढवून महिन्याला 5000 रुपये करणार असल्याचे म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टी
भाजपा जाहीरनामा तयार करण्यासाठी लोकांचे मत घेत आहे. यासाठी एक समिती करण्यात आली असून तिचे नेतृत्व केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन करत आहेत. भाजपाच्या जाहीरनाम्यात सर्वात मोठ्या घोषणा वीज आणि पाण्यासंबंधीत असणार आहेत. मनोज तिवारी यांनीही याबाबत म्हटले आहे की, आम आदमी पार्टीने मागील पाच वर्षात प्रत्येक कुटुंबाला जेवढा लाभ दिल्याचा दावा केला आहे, त्यापेक्षा भाजपा पाचपट जास्त लाभ देईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/